Posts

Showing posts from July, 2011

बिनइयत्तेच्या तुकड्या

कार्यक्रम रंगात आला होता. कार्यक्रम रंगात ओला होता. प्रेक्षक मंडळी चिंब झाली होती. वर्षाऋतूवर आधारित गीतांचा कार्यक्रम चालू होता. सरकारी कार्यालयातील एका प्रशस्त हॉलमध्ये कार्यक्रम चालू होता. कर्मचारी मंडळी आटोपशीर बसली होती. सर्वात पुढे सर्वात सीनियर अधिकारी बसले होते. तल्लीन होवून माना डोलवत होते. त्यांच्या मानेच्या हेलकाव्यांबरहुकूम बऱ्याच माना हिंदकळल्या जात होत्या. काही स्वयंभूपणे डोलत होत्या, तर काही स्वयंभूपणे डोलत नव्हत्या. स्त्रियांसाठी बसण्याची वेगळी रांग होती. यातही सर्वात पुढे सर्वात सीनियर अधिकाऱ्याची सर्वात बायको बसली होती. बाकी इतर बायका सीनिऑरिटीच्या किंवा धैर्यशीलतेच्या किंवा उत्साहाच्या किंवा रसिकतेच्या किंवा भाबडेपणाच्या उतरत्या क्रमानुसार मागे मागे बसत गेल्या होत्या. गाणारणीच्या गळ्यातून सरी बरसत होत्या सुरांच्या. गाणाराही तानापिही झाला होता. साथ देणारी मंडळीही एकजीव झाली होती निपाजा.
निवृत्ती मागे कोपऱ्यात बसला होता आणि नव्हता. त्याच्याबिनइयत्तेच्या तुकड्या झाल्या होत्या. एक तुकडी गाणी ऐकत होती, मास्तर नसलेल्या तुकडीप्रमाणे गदारोळ करीत, तर दुसरी तुकडी आजूबाजूच्यां…

ठार मारण्याच्या पध्दतींची गोष्ट

ठार मारण्याच्या वेगवेगळ्या पध्दती असतात. वेगवेगळ्या समाजात, संस्कृतीत, देशात, प्रांतात त्या वेगवेगळ्या असतात. माणसांना ठार मारण्याचेच जर घेतले, तर असे दिसते की अमेरिकनांनी रेड इंडियनांच्या कत्तली केल्या. हाच पॅटर्न पुढे हिरोशिमा- नागासाकी, इराक युध्द, अफगणिस्तानावरचे हवाई हल्ले यामध्येही दिसून येतो. 
मध्य आशियाई भागात प्रचलित असलेला सार्वजनिक आणि सविस्तर छ्ळ करून ठार मारणे, हा एक प्रकार झाला. शिवाय एस्किमोंमध्ये अगदी निराळाच, म्हाताऱ्या झालेल्या माणसांचा निर्लेपपणे अंत घडवण्याचा प्रकार असतोच. काही ठिकाणी ज्याला ठार मारायचंय त्याचाच ठार मारण्यासाठीही उपयोग केला जातो. भारतातल्या सतीप्रथेमधे हे दिसून येते.
माणसाच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. हीनवनवोन्मेषशालिनी प्रतिभाच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करते. या प्रतिभेने ठार मारण्याच्या पध्दतीतअनेक क्रांत्या घडवल्या.ठार मारण्याच्या पध्दती शोधण्यासाठीची माणसाच्या प्रतिभेची कोटिच्या कोटि उड्डाणे केवळ स्तिमित करणारी आहेत. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जातासुध्दा तिथे ठार मारण्याची प्रक्रिया घडवून आणणे हा एक प्रकार झा…

काळाची गोष्ट

माणसाला गोष्ट सांगण्याची खोड प्राचीन काळापासून आहे. गोष्ट सांगणारे कायम असतातच कुणी कुणी. शिवाय गोष्ट ऐकणारेसुद्धा असतातच सांगणाऱ्यांपेक्षा जास्त. गोष्टी सांगणे आणि ऐकणे यातूनच संस्कृतीच्या विकासाला हातभार लागतो असेही म्हणतात.

तर असाच एक गोष्ट सांगणारा होता. तो म्हणाला, मला एक गोष्ट सांगायचीय. अगदी व्यवस्थित सांगायचीय. छानपैकी. नेहमीसारखी सरधोपट नाही सांगायचीय. आरंभ अंत घटना प्रसंग वगैरे. काहीतरी वेगळा प्रयोग करता येणार असेल तर तोही करून बघायचाय. माझ्या मनात खदखदतंय तेही बाहेर निघायला पाहिजे आणि दर्दी मंडळींकडून वाहवा पण मिळाली पाहिजे. गोष्ट तशी भारत देशातलीच म्हणायला पाहिजे. कारण माझा सगळा प्रत्यक्ष अनुभव भारत देशातलाच आहे. एकदा पायी बॉर्डर क्रॉस करून नेपाळात किंचित जाऊन आलो होतो. पण नेपाळ तरी काय भारतासारखाच म्हणायचा.

गोष्ट भारत देशात नेमकी कुठे घडली हे सांगणं तसं अवघड आहे. हे मान्य आहे की आपल्या भारत देशात ठिकाण सांगण्याला फार महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पक्का ओळखण्यासाठी त्याची जात आणि त्याचे ठिकाण या दोन गोष्टी कंपल्सरी लागतातच. पण तरी मला ठिकाण सांगणं तसं अवघडच जातंय. क…

महारस्ता

महारस्तामुलुखच्या मुलुख बायपास करीत

चौपदर उधळलाय महारस्ता

शेतं तुडवत, डोंगर फोडत

गावांना टांगा मारत नद्या लांघत

बेगुमान निघालाय महारास्ताऊंच ठिकाणी ऊंच होत

सखल ठिकाणी सखल होत

जमीन बदलेल तसा

बदलत राहतो चालूतासाच्या प्रवासाला त्याला

डोंगर लागतो आख्खा

कातरून खडी करून

रिचवून टाकतो पक्काधुरांचे लोटच्या लोट पिऊन

तर्र होतो महारस्ता

ल्हास होतो पण भेलकांडत नाही

पडून राहतो निपचित रात्री

रेडियमचे मवाली डोळे मारत

कुणाला अंथरुणात घेईल

याची कधीच नसते खात्रीलागणखोर महारस्ता

फळवतो संसर्गजन्य वसाहती

पसरवतो अफवा

लावून देतो कलागतीवेगपूर्वकालीन वाटसरूंना

विचारीत नाही महारस्ता

यंत्रमुग्ध होऊन ऐकतो

वेगघोष आर्य मोटारींचाधनगरी मेंढरांचे कळपच्या कळप

चालत राहतात महारस्त्यावरून

हजारो वर्षांच्या वहिवाटीला स्मरून

मेंढरांच्या इवल्या इवल्या पावलांचे

कसलेच स्पर्श होत नाहीत

महारस्त्यांच्या डांबरी खवल्यांना