Posts

Showing posts from May, 2016

शहीद भगतसिंह समग्र वाड्मय: भगतसिंहांच्या अपरिचित पण विलक्षण आणि धगधगत्या विचारविश्वाची आणि व्यक्तिमत्वाची भेट घडवणारा मौलिक ग्रंथ.

वयाच्या अवघ्या साडेतेविसाव्या वर्षी आपले जीवनपुष्पप्राणप्रिय देशावर आनंदाने ओवाळून टाकणार्‍याशहीद भगतसिंहाची ओळख एकसशस्त्र क्रांतिकारक आणि निस्सीम देशभक्त म्हणून सगळ्याच भारतीयांना आहे.पण इतक्या कोवळ्या वयात आपले आयुष्य देशाच्या चरणी हसत हसत अर्पण करणार्‍याशहीदभगतसिंहानी आपल्या अल्पशा आयुष्यात सखोल चिंतन आणि मनन केलेले होतेआणि विविध विषयांवरविविध पद्धतीने आपली मते व्यक्त केली होती याची माहितीफारच कमी जणांना असेल. वयाच्या तेराव्यावर्षीच भगतसिंहानी असहकार आंदोलनातउडी घेतली होती. नंतर वयाच्या सोळाव्या वर्षी घराचा आणिशिक्षणाचा त्यागकरून ते स्वातंत्र्य चळवळीत पूर्ण वेळ सहभागी झाले होते. आजोबा सरदारअर्जुनसिंह, दोन्ही काका आणि वडील यांच्याकडून भगतसिंहांना अन्यायाविरुद्धसर्व शक्तीनिशी लढण्याचा तेजस्वी वारसामिळाला होता. त्यांनी वयाच्यासोळाव्या वर्षापासूनच विविध टोपणनावांनी विविध नियतकालिकांमधूनलेखन केले.भगतसिंहानी वेळोवेळी केलेल्या आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्यासमग्रलेखनाबरोबरच त्यांनी लिहिलेले इतर प्रदीर्घ लेख, केलेली भाषणे, प्रसृत केलेली घोषणापत्रे, लिहिलेली पत्रे, कारागृहात विविध ग्र…