Tuesday, 12 July 2011

महारस्ता

महारस्तामुलुखच्या मुलुख बायपास करीत

चौपदर उधळलाय महारस्ता

शेतं तुडवत, डोंगर फोडत

गावांना टांगा मारत नद्या लांघत

बेगुमान निघालाय महारास्ताऊंच ठिकाणी ऊंच होत

सखल ठिकाणी सखल होत

जमीन बदलेल तसा

बदलत राहतो चालूतासाच्या प्रवासाला त्याला

डोंगर लागतो आख्खा

कातरून खडी करून

रिचवून टाकतो पक्काधुरांचे लोटच्या लोट पिऊन

तर्र होतो महारस्ता

ल्हास होतो पण भेलकांडत नाही

पडून राहतो निपचित रात्री

रेडियमचे मवाली डोळे मारत

कुणाला अंथरुणात घेईल

याची कधीच नसते खात्रीलागणखोर महारस्ता

फळवतो संसर्गजन्य वसाहती

पसरवतो अफवा

लावून देतो कलागतीवेगपूर्वकालीन वाटसरूंना

विचारीत नाही महारस्ता

यंत्रमुग्ध होऊन ऐकतो

वेगघोष आर्य मोटारींचाधनगरी मेंढरांचे कळपच्या कळप

चालत राहतात महारस्त्यावरून

हजारो वर्षांच्या वहिवाटीला स्मरून

मेंढरांच्या इवल्या इवल्या पावलांचे

कसलेच स्पर्श होत नाहीत

महारस्त्यांच्या डांबरी खवल्यांना

1 comment:

  1. Land acquisition is an issue that is going to flare up in near future. The challenge is to ascertain compensation to be given to farmers for taking away their livelihood and purpose for living. You may calculate the land value but how does one calculate the loss of livelihood and the impact on their way of life. These challenges are similar to the one that are faced by those who loose their land for Dams and those who require rehabilitation after an earthquake. The impact on their niche civilisation is heavy which they find difficult to cope up with.

    ReplyDelete