Posts

Showing posts from October, 2012

Shell Companies, अर्थात खोका कंपन्या

गेले काही दिवस विविध टीव्ही चॅनेल्सवरून ’shell companies’ नावाचा शब्दप्रयोग ऐकण्यात येतोय. अमूक एका कंपनीत shell companies मधून investments झाल्यात वगैरे. मराठी वर्तमानपत्रात आर्थिक व्यवहारांबद्दलच्या बातम्या तितक्या सविस्तर आणि सखोल पध्दतीने येत नाहीत. एका मराठी वर्तमानपत्रात बातमी देताना shell कंपनीबाबत मृतवत कंपनी असा उल्लेख केलेला आढळला आणि गंमत वाटली. मराठीत shell कंपनीसाठी असा वेगळा शब्द नाही. हिंदीत ’खोका कंपनी’ असा सार्थ शब्द आहे. मराठीत हिंदीतला आयता ’खोका कंपनी’ हा शब्द वापरता येतो. नाहीतर शब्दश: अनुवाद करायचा झाल्यास कवच कंपन्या असे म्हणता येऊ शकते.


खोका कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्या मार्फत काही व्यापार-व्यवसाय-उदीम चालत नाही, ज्यांची काही जिंदगी (assets) नसते, पण त्यांच्या मार्फत बर्‍याचदा इकडून तिकडे पैसे फिरवण्याचे उद्योग होत राहतात. खोका कंपन्या या नेहमीच काळेबेरे करण्यासाठी निर्माण होतात असे नाही. एखादी खरीखुरी कंपनीसुध्दा तिच्यामार्फत चालणारा उद्योग-व्यवसाय काही कारणाने बंद पडल्यास खोका कंपनीत रुपांतरीत होऊ शकते. एखादी अशी कंपनी की जिची जिंदगी (assets) विकली …

गोष्ट मेंढा गावाची

Image
मागच्या महिन्यात मिलींद बोकील यांनी लिहिलेले "गोष्ट मेंढा गावाची" हे पुस्तक प्रकाशित झाले (मौज प्रकाशन). पुस्तकात बोकीलांनी मेंढा (लेखा) या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावात गेल्या काही दशकांमध्ये स्वयंशासनाचा जो प्रयोग झाला त्याचे फार सुंदर वर्णन केले आहे. "दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार" अशी घोषणा घेऊन सर्वसहमतीने गावचा कारभार चालवणे अशी प्रक्रिया मेंढ्यात बर्‍याच काळापासून चालू होती. गावातलेच देवाजी तोफा हे गृहस्थ आणि मोहन हिराबाई हिरालाल हे सर्वोदयी कार्यकर्ते हे या चळवळीचे धुरीण. २००६ साली लोकसभेत मंजूर झालेल्या आणि २००८ साली नियमावलीसहित तयार झालेल्या वनहक्क कायद्यानुसार गावातल्या वनसंपदेवरचे सामुहिक हक्क मिळवणारे मेंढा हे भारतातले पहिले गाव (ऑगस्ट २००९). त्यानंतर गावाने आपल्या मालकीच्या बांबूची विक्री रीतसर लिलाव वगैरे करून व्हॅट भरून PAN, TAN वगैरे काढून केली. मे-जून २०११ मध्ये २१,५०,००० रुपयांची बांबूविक्री झाली आणि २०११-१२ या सालातल्या बांबूविक्रीसाठीची निविदा एक कोटी शहाण्णव हजारांची झाली.मेंढा गावाने स्वतः होऊन शिक्षण, ग्रामविकास यासं…