Posts

Showing posts from September, 2011

शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एका वेगळ्या कोनातून

शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. आत्महत्यांची कारणमीमांसा करणारे विचार वेगवेगळ्या व्यासपीठांवर आणि माध्यमांमार्फत मांडले जात आहेत. आत्महत्यांचा अर्थ लावण्याचे आणि त्यानुसार धोरणांना दिशा देण्याचे प्रयत्नसुद्धा वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या आकलनानुसार आणि अजेंड्यानुसार करत आहेत. मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाची मदत घेऊन बोलायचे झाल्यास जो तो आपापल्या मूल्यचौकटीतून या घटनांकडे बघतो आहे. या बघण्याचे असे जितके जास्त कोन मिळतील तितके आपण त्या घटनांच्या मुळाशी पोहचू शकू. 
 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा आजवर घेतलेला तपास पाहता असे लक्षात येते की ’ भांडवली शेती समर्पक पध्दतीने करता न येणे आणि भांडवली शेती करण्यात आलेल्या अपयशाची नीट व्यवस्था लावता न येणे ’ या कारणाची संभवनीयता नीट तपासली गेलेली नाहीये. इथे सुरुवातीलाच हे लक्षात घेतले पाहिजे की आत्महत्यांची समस्या ही गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांची नाही. गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना मुळात भांडवली पध्दतीची शेती करण्याचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे तो पर्याय हाताळताना निर्माण होणाऱ्या दुःखाला त…