Posts

Showing posts from January, 2017

नोटबंदीचे समर्थन: एक तपासणी (१७/१२/१६ रोजीचे टिपण)

नोटबंदीचा निर्णय जाहीर होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. अजूनही या निर्णयाबद्दलच्या टोकाच्या चर्चा चालू आहेत. एकूण निर्णयाची व्याप्ती आणि प्रभाव पाहता हे स्वाभाविक आहे. यानिमित्ताने होणाऱ्या चर्चा मात्र एकतर इकडची किंवा तिकडची अशी बाजू अटीतटीने मांडणाऱ्या दिसताहेत. पैकी नोटबंदीचे समर्थन करणाऱ्यांना उद्देशून काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न खाली करत आहे.
1) आपल्याला प्रिय असलेल्या नेत्याने, आपल्याला आवडणाऱ्या पक्षाने किंवा आपल्या विचारसरणीशी मिळतीजुळती विचारसरणी असलेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण समर्थन केलेच पाहिजे अशी काही भावनिक आवश्यकता आपल्याला वाटते काय? अशा भावनिक आवश्यकतेपोटी तर आपण या निर्णयाचे समर्थन करत नाही ना? आपल्या प्रिय आणि आदरणीय अशा व्यक्तीने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचीे तरी आपण चिकित्सा करू शकलो पाहिजे की नाही? चिकित्सा करणे, चिकित्सक असणे ही जागरूक नागरिक आणि मतदार असण्याची एक महत्वाची अट नाहीय का? या पार्श्वभूमीवर बघता आपण जे नोटबंदीचे समर्थन करतो आहोत ते पुरेशा चिकित्सेनंतर करत आहोत काय? की आपण केवळ भावनिक होऊन प्रतिक्रिया देतोय आणि मत बनवतोय? आपले प्रिय न…