Posts

Showing posts from April, 2015

’कोर्ट’ या नव्या मराठी चित्रपटाबद्दल

’इंडियाज डॉटर’ ह्या निर्भयावरच्या डॉक्युमेंटरीबद्दल

निर्भयावरची डॉक्युमेंटरी सणसणीत थोबाडीत मारते. ही थोबाडीत खासकरुन मॅडिसन स्क्वेअरवर आणि सिडनीच्या ऑल फोन्स एरिनावर जमलेल्या गर्दीच्या उन्मादी मानसिकतेला घायाळ करणारी आहे. हे आपलेच बांधव जे बायकामुलींबद्दल मध्ययुगीन मानसिकता बाळगतात, ज्यांचे पालनपोषण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वंचितावस्थेत झालेले आहे, जे महासत्ताक भारतीयांना अनऑर्गनाइज्ड सर्व्हिस सेक्टरमध्ये नोकर म्हणून हवे आहेत पण सहनागरिक म्हणून नको आहेत, जे त्यादिवशी बसमध्ये एकविसाव्या शतकातल्या ऍस्पिरेशनल भारतातल्या एका उमलत्या आणि उड्डाणोत्सुक तरुणीवर अमानवी अत्याचार करत होते.

निर्भयाच्या गोष्टीद्वारे सगळ्याच समाजाने निर्माण केलेले शहाजोग मिथक डॉक्युमेंटरी मोडते. असे मिथक की ज्यामध्ये बलात्कारी लोक हे मुळापासूनच दुष्ट आणि पाशवी आहेत. आयते आणि सुटसुटीत खलनायक आहेत. बलात्कारयांच्या पाशवीपणाची आजुबाजूच्या परिस्थितीत असणारी लालतांबडी लसलशित मुळे डॉक्युमेंटरी दाखवते. अशी मुळे जी ओढायला गेल्यानंतर आपल्या सगळयांनाच हादरे बसतील. सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात झिरपुन असलेल्या पुरुषसत्ताक आणि स्त्रियांबाबत मागास दृष्टिकोण बाळगणा…