Posts

Showing posts from 2012

Life of Pi पाहताना

मितींच्या जबड्यातून विस्फारत अनंताकडे विरघळत जाते अवघे थिएटर

नाचतात थुईथुई भानांचे कण

निखळताना वास्तवाचे विक्राळ anchorसुरु होतो प्रशांत प्रवास

प्रपाती लाटांच्या प्रच्छन्न हेलकाव्यांवरून

उजळवत चुकार कोपरे

आयुष्यभराच्या गुहेतले आदिम.रेंगाळतो मोरपंखी तृणपात्यावर

महासागराचा निळासावळा दवबिंदू

प्रकटतो सृष्टीचा प्रकांड सांधा

प्रकाशताना खोल पाताळझरे

Shell Companies, अर्थात खोका कंपन्या

गेले काही दिवस विविध टीव्ही चॅनेल्सवरून ’shell companies’ नावाचा शब्दप्रयोग ऐकण्यात येतोय. अमूक एका कंपनीत shell companies मधून investments झाल्यात वगैरे. मराठी वर्तमानपत्रात आर्थिक व्यवहारांबद्दलच्या बातम्या तितक्या सविस्तर आणि सखोल पध्दतीने येत नाहीत. एका मराठी वर्तमानपत्रात बातमी देताना shell कंपनीबाबत मृतवत कंपनी असा उल्लेख केलेला आढळला आणि गंमत वाटली. मराठीत shell कंपनीसाठी असा वेगळा शब्द नाही. हिंदीत ’खोका कंपनी’ असा सार्थ शब्द आहे. मराठीत हिंदीतला आयता ’खोका कंपनी’ हा शब्द वापरता येतो. नाहीतर शब्दश: अनुवाद करायचा झाल्यास कवच कंपन्या असे म्हणता येऊ शकते.


खोका कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्या मार्फत काही व्यापार-व्यवसाय-उदीम चालत नाही, ज्यांची काही जिंदगी (assets) नसते, पण त्यांच्या मार्फत बर्‍याचदा इकडून तिकडे पैसे फिरवण्याचे उद्योग होत राहतात. खोका कंपन्या या नेहमीच काळेबेरे करण्यासाठी निर्माण होतात असे नाही. एखादी खरीखुरी कंपनीसुध्दा तिच्यामार्फत चालणारा उद्योग-व्यवसाय काही कारणाने बंद पडल्यास खोका कंपनीत रुपांतरीत होऊ शकते. एखादी अशी कंपनी की जिची जिंदगी (assets) विकली …

गोष्ट मेंढा गावाची

Image
मागच्या महिन्यात मिलींद बोकील यांनी लिहिलेले "गोष्ट मेंढा गावाची" हे पुस्तक प्रकाशित झाले (मौज प्रकाशन). पुस्तकात बोकीलांनी मेंढा (लेखा) या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावात गेल्या काही दशकांमध्ये स्वयंशासनाचा जो प्रयोग झाला त्याचे फार सुंदर वर्णन केले आहे. "दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार" अशी घोषणा घेऊन सर्वसहमतीने गावचा कारभार चालवणे अशी प्रक्रिया मेंढ्यात बर्‍याच काळापासून चालू होती. गावातलेच देवाजी तोफा हे गृहस्थ आणि मोहन हिराबाई हिरालाल हे सर्वोदयी कार्यकर्ते हे या चळवळीचे धुरीण. २००६ साली लोकसभेत मंजूर झालेल्या आणि २००८ साली नियमावलीसहित तयार झालेल्या वनहक्क कायद्यानुसार गावातल्या वनसंपदेवरचे सामुहिक हक्क मिळवणारे मेंढा हे भारतातले पहिले गाव (ऑगस्ट २००९). त्यानंतर गावाने आपल्या मालकीच्या बांबूची विक्री रीतसर लिलाव वगैरे करून व्हॅट भरून PAN, TAN वगैरे काढून केली. मे-जून २०११ मध्ये २१,५०,००० रुपयांची बांबूविक्री झाली आणि २०११-१२ या सालातल्या बांबूविक्रीसाठीची निविदा एक कोटी शहाण्णव हजारांची झाली.मेंढा गावाने स्वतः होऊन शिक्षण, ग्रामविकास यासं…

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ – दुःखद अस्वस्थता निर्माण करणारे अंतःप्रवाह

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ – दुःखद अस्वस्थता निर्माण करणारे अंतःप्रवाह
’मुक्तशब्द’च्या मार्च २०११ च्या अंकातील रवींद्र इंगळे चावरेकर यांचा “हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ – सामाजिक अंतःप्रवाहाचा ऐतिहासिक अनुबंध” हा लेख वाचला. या लेखाद्वारे हिंदू कादंबरीतील अंतःप्रवाह उघड करण्याचे काम लेखकाने यशस्वीरीत्या केलेले दिसते. या अंतःप्रवाहांमधून नेमाडेंच्या कादंबरी-चतुष्ट्य लिहिण्यामागे असलेल्या भूमिकेचेसुद्धा सूचन होते. चावरेकरांची मांडणी वाचल्यानंतर हिंदू वाचल्यावर मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि मुद्दे आणखी ठळक व्हायला मदत झाली. त्यापैकी काहींची चर्चा खाली केलेली आहे.
१. सिंधुसंस्कृती – तिचा ऱ्हास – वैदिक संस्कृती व सिंधुसंस्कृती यांमधील परस्परसंबंध – सिंधुसंस्कृती ते आत्ताची खेडी यातील सातत्त्य हे सगळे विषय खरे तर गुंतागुंतीचे आणि तज्ञ मंडळींमधील हाणामाऱ्यांचे आहेत. असे असताना याबाबत काही ठाम विधाने करीत त्यांचा वापर कादंबरीत करणे याचा अर्थ स्वतःच्या अंतिम विधानाला / भूमिकेला अनुरूप असा construct निर्माण करणे असा आहे. हा construct प्रचलित इतिहास संशोधनाच्या कसोटीवर न टिकणारा आहे. यातली …

गो.पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकातील जोतिबा फुल्यांच्या बांधकामाची चिकित्सा आणि पुढची चर्चा

गो.पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकातील जोतिबा फुल्यांच्या बांधकामाची चिकित्सा आणि पुढची चर्चा


१. बांधकाम आणि चिकित्सा:

गो. पु. देशपांडे यांनी सत्यशोधक या जोतिबा फुल्यांवर लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग हिंदीत दिल्लीमध्ये १०/९/९२ रोजी आणि मराठीत कोल्हापुरात ६/१०/९३ रोजी झाला. नाटकाची मराठी लेखी आवृत्ती १९९६ साली प्रकाशित झाली. प्रत्येक साहित्यकार आपल्या साहित्यकृतीत काही एक बांधकाम करत असतो. वाचकागणिक ते बांधकाम वेगवेगळे प्रतीत होऊ शकत असले तरी साहित्यकाराच्या बांधकामाचा काही एक अंदाज बांधता येऊ शकतो. गोपुंनी नाटकामध्ये केलेले जोतिबा फुल्यांचे बांधकाम समजावून घेऊन पुढची चर्चा करण्याचा प्रयत्न सदर लेखाद्वारे करण्याचे प्रयोजन आहे. असे करताना नाटकाची लिखित संहिताच केवळ विश्लेषणासाठी समोर ठेवलेली आहे. विविध काळात झालेल्या नाटकाच्या विविध मंचनाचे संदर्भ घेतलेले नाहीत.

नाटकातली सूत्रधारवजा पात्रे सुरुवातीलाच नाटकाविषयी खुलासा करतात की हे नाटक नसून एक प्रकारचा सत्यशोधकी जलसा आहे. सत्यशोधकी जलसा म्हणजे “सत्यशोधक समाजाने आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी नाटकाचा घाट वापरुन निर्माण केलेला प्रक…

Introduction to the book "Selected Essays of Dr S S Kalbag on Education, Technology & Rural Development"

In the post independence period India has been a witness to many educational experiments as well as theories which are based on the principles such as “learning while doing”, “learning through productive work”, etc. Many of these experiments and theories have borrowed ideas from the “programme of basic education” propagated by Gandhiji. However these experiments and theories lacked confidence in the use of science & technology and were suffering from disconnect with the real needs of the rural masses. Dr. Shrinath Sheshagiri Kalbag, a scientist turned educationist, exhibited confidence and conviction of a rare quality about the relevance and usefulness of the new technological developments in education based on productive work.


Dr. Kalbag was a quintessential scientist with extraordinary commitment to the people at grassroots. He was very much pained by the great divide between haves and haves not in the Indian society. He always tried to diagnose it from the perspective of a sc…