Posts

Showing posts from 2016

शासनव्यवस्थेतील बदलांची आवश्यकता आणि वाटचाल: आयकर विभागातील स्थिती

भारतीय उपखंड हा हजारो वर्षांचे अतिशय मनोहर असे बहुपेडी सामाजिक-सांस्कृतिक एकत्व असलेला प्रदेश आहे. या प्रदेशापैकी बहुतांश भौगोलिक क्षेत्रावर पसरलेले भारत म्हणजेच इंडिया हे नेशनस्टेट त्यामानाने अगदीच नवे आहे. आणि या नेशनस्टेटची (ज्याला राष्ट्र हा समानार्थी शब्द आपण वापरूयात) निर्मिती जरी १५ ऑगस्ट १९४७ साली सुरु झालेली असली तरी ही प्रक्रिया विविध पातळ्यांवर अजूनही चालूच आहे. नव्या राष्ट्राच्या शासनव्यवस्थेचा समग्र पाया रचणार्‍या घटनेच्या निर्मितीची प्रक्रियादेखिल काही वर्षे चाललेली होती. केन्द्र आणि राज्य पातळीवरच्या विविध शासनव्यवस्था आणि उपव्यवस्था तसेच निवडणूक आयोग, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Controller and Auditor of India) सारखी घटनात्मक उपांगे ही घटनेतल्या तरतुदींमधून उर्जा घेऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर विकास पावत गेलेली दिसतात. या विविध शासनांगापैकी बर्‍याचशा अंगांची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळात असणार्‍या त्यांच्या स्वरुपाच्या आधारेच करण्यात आलेली होती. या कामी आयत्याच उपलब्ध असलेल्या आणि आपल्याच देशात काही दशकांपासून उत्क्रांत होत असलेल्या व्यवस्था आणि रचनांचा उपयोग केला जाणे …

फरश्या

सलग चौथ्या दिवशी तो घरात बसलेला होता. फरश्या फोडण्याचे आवाज चालूच होते. घरभर सगळीकडे सिमेंट आणि वाळू मिश्रित धूळ झालेली. फोडलेल्या फरश्या बाहेर घेऊन जाणार्‍यांच्या पावलांच्या सिमेंटयुक्त ठश्याने घरातच बाहेरपर्यंत जाणार्‍या वेगळयाच पाउलवाटा तयार झाल्या होत्या. एरव्ही ऐटीत आपापल्या ठिकाणी असणारं सामान कसंबसं जुन्या बेडशिटा आणि चादरींच्या खाली माना मुडपून बसलेलं होतं. धुळीचा आाणि सततच्या आवाजांचा वेढा गेल्या काही दिवसांपासून पडलेला होता. बायकोनं सतत स्वयंपाकघराचा बालेकिल्ला मात्र धुळीपासून शाबूत ठेवला होता.

गेल्या कित्येक दिवसांपासून घरातल्या चार खोल्यांपैकी दोन खोल्यातल्या फरश्या फुगून वरती यायला लागल्या होत्या. काही ठिकाणी फरश्यांना भेगा पडून त्या फुटायला लागल्या होत्या. फुटणार्‍या फरश्या चालताना पायाला लागून दुखापती होण्याची शक्यता वाढत चालली होती. एवढी वर्षे साथ देणार्‍या फरश्यांनी अचानक जमीन सोडायला सुरुवात केली होती.

फरश्यातलं समजणार्‍या माणसाला बोलावलं तर तो म्हणाला की फरश्या बदलाव्या लागतील. सोसायटीतल्या जवळपास सगळयाच घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, बर्‍याच घरातल्या तर मीच बदलल्यायत अ…

कोळसा घोटाळा: सनदी अधिकार्‍यांची जबाबदारी आणि व्यवस्थासुधारणेची आवश्यकता

कोळसा खात्यातील माजी सचिव श्री हरिश चंद्र गुप्ता यांच्या वर सीबीआयच्या ट्रायल कोर्टात खटला चालू आहे. कोळसा घोटाळ्यानंतर अनेक सनदी अधिकार्‍यांवर, पुढार्‍यांवर आणि खाजगी कंपनीतल्या अधिकार्‍यांवर खटले दाखल झाले होते. २००८साली निवृत्त होण्यापूर्वी दोन वर्षे कोळसा मंत्रालयात सचिवपदी असलेले गुप्ता या खटल्यातले एक प्रमुख आरोपी आहेत. काही दिवसांपूर्वी गुप्ता यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली होती. जामीन वगैरे प्रकाराकामी वकील नेमण्यासाठी आपण आपल्या जवळची निवृत्तीनंतरची मर्यादित गंगाजळी खर्च करू इच्छित नाही असे त्यांचे म्हणणे होते.  सनदी अधिकार्‍यांच्या वर्तुळात गुप्ता यांची एक प्रामाणिक अधिकारी अशी ओळख असल्याने अनेक आजीमाजी सनदीअधिकारी तसेच सनदी अधिकार्‍यांच्या संघटनेने गुप्तांना पाठिंबा व्यक्त करणारी आणि अशा घटनांमुळे एकंदर सनदी अधिकार्‍यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे सूचित करणारी निवेदने केली. यानिमित्ताने एकंदर भ्रष्टाचार, शासकीय निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्यांची जबाबदारी, आणि यासंदर्भातल्या सध्याच्या व्यवस्था याबद्दलच्या चर्चेस चालना मिळाली. म…

आर्थिक वर्तणुकीच्या ढासळत्या निर्देशांकाचे काय?

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांचे जणू काही पेवच देशभर फुटल्याचे दिसते. राज्यकर्त्यांचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कॉर्पोरेटवाल्यांचे, व्यापाऱ्यांचे, व्यावसायिकांचे, असे अनेक आर्थिक घोटाळे बाहेर येताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिक नावाचा जो काही एक कल्पित घटक असतो, त्यास यातना देणाऱ्या आणि सुन्न करणाऱ्या या घटना आहेत असे एक ठोकळेबाज विधान सहज करता येऊ शकते. पण गंमत अशी आहे की अगदीच तळाचा रगडला जाणारा वर्ग सोडता, बाकी उरलेले सारेच ढिल्या आणि संशयास्पद आर्थिक वागणुकीचे दोषी दिसतात. फरक प्रमाणाच्या आणि होणाऱ्या एकंदर परिणामाच्या तीव्रतेच्या बाबतीत असतो.
मनुष्य हा आर्थिक प्राणी आहे असे म्हटले जाते. आर्थिक व्यवहार हे एकूण समाजव्यवहारांचा एक महत्त्वाचा भाग असतात. किंबहुना औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि एकंदरीत आधुनिकीकरण यांचा परिणाम म्हणून आर्थिक व्यवहारांना असणारे महत्त्व वाढत गेलेले दिसते. जसजशी आर्थिक व्यवहारांची व्याप्ती आणि त्यांचे महत्त्व वाढत गेले तसतसे आपोआपच त्यासाठीचे नियम, कानून, मूल्ये विकसित होत गेल्याचे दिसते. ही प्रक्रिया सगळ्याच समाजांमध्ये समान पद्धतीने आणि गतीने झाले…