Posts

Showing posts from August, 2012

गो.पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकातील जोतिबा फुल्यांच्या बांधकामाची चिकित्सा आणि पुढची चर्चा

गो.पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकातील जोतिबा फुल्यांच्या बांधकामाची चिकित्सा आणि पुढची चर्चा


१. बांधकाम आणि चिकित्सा:

गो. पु. देशपांडे यांनी सत्यशोधक या जोतिबा फुल्यांवर लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग हिंदीत दिल्लीमध्ये १०/९/९२ रोजी आणि मराठीत कोल्हापुरात ६/१०/९३ रोजी झाला. नाटकाची मराठी लेखी आवृत्ती १९९६ साली प्रकाशित झाली. प्रत्येक साहित्यकार आपल्या साहित्यकृतीत काही एक बांधकाम करत असतो. वाचकागणिक ते बांधकाम वेगवेगळे प्रतीत होऊ शकत असले तरी साहित्यकाराच्या बांधकामाचा काही एक अंदाज बांधता येऊ शकतो. गोपुंनी नाटकामध्ये केलेले जोतिबा फुल्यांचे बांधकाम समजावून घेऊन पुढची चर्चा करण्याचा प्रयत्न सदर लेखाद्वारे करण्याचे प्रयोजन आहे. असे करताना नाटकाची लिखित संहिताच केवळ विश्लेषणासाठी समोर ठेवलेली आहे. विविध काळात झालेल्या नाटकाच्या विविध मंचनाचे संदर्भ घेतलेले नाहीत.

नाटकातली सूत्रधारवजा पात्रे सुरुवातीलाच नाटकाविषयी खुलासा करतात की हे नाटक नसून एक प्रकारचा सत्यशोधकी जलसा आहे. सत्यशोधकी जलसा म्हणजे “सत्यशोधक समाजाने आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी नाटकाचा घाट वापरुन निर्माण केलेला प्रक…