Posts

Showing posts from March, 2017

अर्थक्रांती: ढोबळ मांडणी, विपरीत तर्क आणि भुरळ पाडणारा प्रचार

Image
नोटबंदीच्या निर्णयानंतर अर्थक्रांती या नावाने केलेली जाणारी मांडणी चर्चेत आहे. देशाच्या अनेक सामाजिक समस्यांचे मूळ आर्थिक दुरावस्थेत आहे आणि या दुरावस्थेस दोषपूर्ण करव्यवस्था आणि दुबळी बॅंकिंग व्यवस्था कारणीभूत आहेत असे अर्थक्रांतीचे म्हणणे आहे. या मूलभूत त्रुटी अर्थक्रांतीने सुचवलेल्या उपायांमुळे अतिशय कमी काळात (अर्थक्रांतीच्या पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे दोन वर्षात) कमी होऊ शकतात आणि भारत देश विकसित देशांच्या पंक्तीत स्थान मिळवू शकतो.  ही मांडणी अर्थक्रांती प्रतिष्ठाण या नावाच्या स्वयंसेवी संस्थेद्वारे गेल्या दोन दशकांपासून चालू आहे. ज्या प्रमाणात या कल्पनेच्या प्राथमिक स्वरूपाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे त्या प्रमाणात त्यावर समीक्षात्मक चर्चा आणि त्या अनुषंगाने मांडणीचा विस्तार झालेला दिसत नाही. अर्थक्रांतीचे उपाय खालीलप्रमाणे आहेत १. सध्या अस्तित्वात असलेली करप्रणाली संपूर्णतः रद्द करणे २. त्याऐवजी बॅंक ट्रांझॅक्शन टॅक्स आणणे (उदा २% प्रतिव्यवहार) ३. व्यवहारातल्या उच्च दर्शनमूल्याच्या (रु १००, ५००, १०००) चलनी नोटांचे उच्चाटन करणे ४. २००० रुपयांपर्यंतचे रोखीचे व्यवहार करमुक्त करण…