उस्मानाबाद
जवळच्या तेर गावास नुकतीच
भेट दिली. इ.स. पूर्व चारशे पासून वस्ती असलेली
आणि इसवी सनाचे पहिले शतक ते दुसरे –तिसरे शतक या काळात बहरलेली आणि नंतरही मध्ययुगापर्यंत महत्वाचे ठिकाण असणारी समृद्ध
आणि सम्पन्न प्राचीन तगर नगरी. टॉलेमीने नोंद घेतलेल्या आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी
या प्राचीन ग्रंथात पैठणनंतरचे महत्वाचे व्यापारी शहर म्हणून
उल्लेखलेल्या या गावात फिरण्याची संधी मिळाली. अनेक पांढरीची टेकाडे तेरणा
नदीकाठी दिसतात ज्यांचे उत्खनन होणे बाकी आहे. जिथे उत्खनन झाले आहे ते नंतर
झाकून ठेवलेले आहे. पण जरा आतल्या बाजूने फिरायला लागलो की प्राचीन
खापरांच्या तुकड्याचे खचच्या खच दिसायला लागतात आणि आपण दोनेक हजार वर्षे मागे
गेलो आहोत असा अद्भुत भास होउ लागतो. इ. स. चौथ्या ते पाचव्या शतकातले
त्रिविक्रम मंदिर (या मन्दिराच्या कालनिश्चितीबद्दल वेगवेगळी मते दिसतात),
सहाव्या शतकातले उत्तरेश्वर मंदिर, त्याच काळातले कालेश्वर मंदिर या वास्तू
बघण्यासारख्या आहेत.
(त्रिविक्रम मन्दिर)
त्रिविक्रम मंदिर मूळचे विटांमध्ये बांधलेले आणि चैत्याच्या आकाराचे आहे. त्यामुळे ही वास्तू म्हणजे बौद्ध धर्मियांचा चैत्य होता असे म्हणतात. काही जणांनी हे पल्लव शैलीतले हिन्दू मंदिर असावे असेही म्हटले आहे.
(त्रिविक्रम मन्दिराचे चैत्य शैलीतले गजपृष्ठाकृती गर्भगृह)

(त्रिविक्रम मन्दिराच्या मंडपाच्या छताच्या मध्यभागी असलेले प्राचिन लाकडी पुष्पवर्तुळ)
उत्तरेश्वर मंदिराचेही बांधकाम विटांचे आहे. विविध आकारातल्या आणि डिझाइनच्या विटा मनोहारी आहेत. विटांमधले कोरीव कामच जणू.
(उत्तरेश्वर मन्दिर समोरच्या बाजूने)
(शिखरावरील जुने विटकाम, उत्तरेश्वर मन्दिर)
उत्तरेश्वर मंदिराचेही बांधकाम विटांचे आहे. विविध आकारातल्या आणि डिझाइनच्या विटा मनोहारी आहेत. विटांमधले कोरीव कामच जणू.
(शिखरावरील जुने विटकाम, उत्तरेश्वर मन्दिर)
(उत्तरेश्वर मन्दिराच्या प्रवेश्द्वाराची चौकट. सध्या ही म्युझियममध्ये ठेवलेली आहे)
तेर हे संत गोरोबा कुंभारांचेही गाव. संत गोरोबा कंभारांचे मंदिर कालेश्वर मंदिराशेजारी आहे.
(गोरोबा काका कुंभार समाधी मन्दिर आणि कालेश्वर मन्दिराचे सामायिक प्रवेश्द्वार)
(कालेश्वर मन्दिर बाजूने काढलेला फ़ोटो)
(कालेश्वर मन्दिराचे द्राविड पद्धतीचे शिखर जवळून)
टेराकोटा, पॉटरी, विटा इत्यादि मातीकामातल्या इतक्या सुंदर कलाकृती असणारया गावात पूर्वी कुंभारांची मोठी वस्ती असणेही स्वाभाविक. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील गावे (मच्छलीपट्टणम) ते पैठणमार्गे भडोच या सातवाहनकालीन व्यापारी महामार्गावरचे तगर उर्फ तेर हे महत्वाचे शहर होते. (काही विद्वानांच्या मते प्राचीन तगर म्हणजे जुन्नर तर काहीजण कोल्हापूर असेही म्हणतात. पण एकुणात तेर गाव हे जास्त प्रबळ दावेदार समजले जाते)

रामलिंगण्णा
लामतुरे या गावकर्याने स्वत:च्या हौसेपोटी
तेर परिसरात सापडणारया शेकडो प्राचीन वस्तूंचा संग्रह केला. त्यांचा खाजगी संग्रह त्यांनी
नंतर सरकारला सुपूर्त केला. हे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
(फोटो: इंटरनेटवरुन)
या संग्रहालयातही सुधारणा करायला भरपूर वाव आहे. आता इथे साधे ब्रॉशरसुद्धा उपलब्ध नाहीय. संग्रहालयातल्या प्राचीन रोमन व्यापाराच्या अनेक खुणा बाळगणारया विविध वस्तू मात्र आवर्जून बघाव्यात अशा आहेत. वस्तून्मधले वैविध्य वाखाणण्याजोगे आहे. अत्यंत बारीक कलाकुसर असलेले लाइमस्टोनमधले बारके साचे, उत्कृष्ठ दर्जाचे टेराकोटा आर्टिफॅक्ट्स (मद्याच्या सुरया, छोटे दिवे, इत्यादी), सातवाहनकालीन नाणी, लज्जागौरीची अनेक सुंदर सुंदर टेराकोटा आणि दगडातली शिल्पे (रा. चिं. ढेरे यांच्या मते लज्जा गौरी ही प्राचीन काळातली fertility शी संबंधित उपास्यदेवता होती), जैन तीर्थंकरांच्या सुंदर मुर्ती, प्राचीन बौद्ध स्तुपाचे दगडी अवशेष, उत्तरेश्वर मंदिरातल्या दरवाजाची अपूर्व असे कोरीव काम असलेली लाकडी चौकट अशा नाना सुंदर वस्तू इथे आहेत.
लज्जागौरीच्या अनेक छोट्या टेराकोटाच्या मुर्ती तेरच्या म्युझियममध्ये सापडतात. डॉ. ह. धी. सांकलिया यांच्या मते ही मूळची विदेशी देवता इजिप्तमधून रोमन संपर्काच्या काळात, ख्रिस्तोत्तर पहिल्या एक दोन शतकात भारतात आली. शहरी व्यापाराचा परिणाम म्हणून धार्मिक, सांस्क्रुतिक कल्पना, श्रद्धा यांचेही आदानप्रदान होणे स्वाभाविक असते. भारतातल्या मूळच्या सुप्रजननाविषयीच्या धार्मिक समजुती आणि देवकल्पनेवर ह्या व्यापाराच्या परिणामातून आलेल्या नव्या देवताआकाराचे आरोपण होउन लज्जागौरी हा प्रकार सुरु झाला असावा असे म्हणतात. त्यामुळेच या देवतामुर्ती मुख्यत: पश्चिम आणि दक्षिण भारतात (peninsular india) खासकरुन सातवाहन कालीन व्यापारी मार्गावरील ठिकाणांमध्ये सापडतात.

इतक्या सगळ्या अपूर्व अशा प्राचीन इतिहासाची साक्ष देणार्या
गोष्टी असूनही तेर गावाची एक पर्यटन स्थळ म्ह्णून असलेली स्थिती दयनीय आहे. माहिती
सांगणार्या गाइडची
व्यवस्था नाही,
गावात फ़िरताना मंदिरांची, महत्वाच्या
वास्तूंची दिशा दाखवणारे फलक
नाहीत., म्युझियममध्ये माहितीपर पुस्तिका नाहीत, गावकर्यांना
इथल्या ऐतिहासिक वारशाबद्दल ममत्व नाही. तेर गाव जर युरोपात असते तर त्याचे किती कौडकौतुक झाले असते. किती देखणे म्युझियम
गावात उभे राहिले असते किती सोयीसुविधा असत्या आणि जगभरचे पर्यटक आकर्षित झाले असते. आपल्याइथली डिफॅक्टो व्यवस्था अजूनही
सरंजामी सत्राप पद्धतीचीच आहे. म्हणजे राज्य/प्रदेश पातळीवरचा एक म्होरक्या
(उदा. साहेब वगैरे)
आणि मग उपप्रदेश पातळीवरचे आणि खाली जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर.
ह्यांच्यापैकी कुणालाही ऐतिहासिक दृष्टी किंवा टुरिझमच्या अंगाने व्हिजन असण्याची
शक्यता नाहीय. आणि या दांडगटांना वगळून काही करता येणे कठीण आहे. शिवाय वेगवेगळ्या
डिपार्टमेंट्सध्ये समन्वयाचा अनुभव असतो. ASI बद्दल तर न बोललेलेच बरे. तेरमध्ये
त्रिविक्रम मंदिराचे रिस्टोरेशन करताना विटकामाच्या भिंतींवरून बाहेरुन
चुन्याच्या भिंती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे या वास्तूचे अतिशय शोचनीय
विदृपीकरण झाले आहे. अशीच परिस्थेती कालेश्वर मंदिराची आहे.
आपल्या
इथे ऐतिहासिक दृष्टीचा दुष्काळ आहे. धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातले मेनस्ट्रीम मधले
धुरीण अजूनही मध्ययुगीन दृष्टी बाळगुन आहेत तर बहुजन मंडळी गेल्या काही
शतकात सापडलेल्या नव्या आयकॉन्सचे दैवतीकरण करण्यात मग्न आहेत. अशात मग
आपल्या सम्पूर्ण प्रदेशाचा जवळपास तीनचार शतके सुवर्णकाळ असलेल्या सातवाहन
काळाबद्दल सर्वांनी मिळून आत्मीयता आणि अभिमान बाळगणे तर फारच दुरापस्त
गोष्ट झाली. सातवाहन काळ ही एकमेव राजवट अशी आहे की जिचे अवशेष महाराष्ट्राच्या सगळ्या
विभागांमध्ये (खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण) सापडतात. शिवाय
या लोकांचे मूळ महाराष्ट्रात होते आणि हल्ली मराठी भाषेचे मूळही या राजवटीच्या
काळात शोधले जाते आहे.
अशा
वेळी टर्कीसारख्या इस्लामी देशात, जिथे
कित्येक शतके इस्लामी
साम्राज्याचे गंडस्थळ होते, तिथे
पुरातत्वशास्त्रास भरपूर महत्व देउन आपल्या कारकीर्दीत सम्पूर्ण तुर्कस्तानात उत्खननाची मोहीम हाती
घेणारया केमाल
पाशाची आठवण होते. हल्ली इस्लामिक नेते सातव्या शतकाच्या मागे सहसा जाउ धजत नाहीत. पण
केमाल पाशाने उत्खननातुन उजागर झालेला टर्कीचा इ. स. पूर्व सहाव्या सहस्त्रकापासूनचा इतिहास
वंदनीय मानला. उत्खननात सापडलेल्या तिसरया सहस्त्रकातल्या ब्रॉंझच्या
काळविटाच्या शिंगासारख्या सुंदर मोटिफच्या शिल्पाकृतीची अंकाराच्या
प्रमुख चौकात त्याने उभी केलेली प्रचंड मोठी प्रतिकृती बघण्यासारखी आहे.
या
पार्श्वभूमीवर आपल्या इथे या विषयाची होणारी परवड पराकोटीची आहे. तेरमध्येच अडुसष्ठ साली
केलेल्या उत्खननात प्राचीन बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. सव्वीस
मीटर व्यास असलेला हा स्तुप अद्वितीय होता (सांची स्तुपाचा व्यास 36 मीटर). स्तुपाची बांधणी एका मोठ्या
चक्रात दुसरे
लहान चक्र अशी होती. दुर्दैवाने या अवशेषांचा आता ठावठिकाणाही राहिलेला नाही. हा
भाग आता नांगरटीखाली आहे. अवशेषांचे फोटोच फक्त आहेत. आणि हळहळ. तेरमध्ये काही नदीकाठच्या
पांढरीच्या टेकाडांवर (archeological mounds) सध्या वस्ती आहे. या टेकाडांच्या
नदीकडेच्या बाजूला जवळपास दहा पंध्रा फुट खोलीचे उभे छेद बघायला
मिळतात. यात जुन्या वस्तींचे थर, वेगवेगळी
खापरे, इ. बघायला मिळतात.
(पांढर्या टेकाडाची नदीकडेची बाजू)
(पांढर्या टेकाडाचा नदीकडेचा छेद जवळून. खापरांचे थर दिसताहेत)
मी अशा एका टेकाडाच्या नदीकडेच्या भागात फिरलो. हा परिसर म्हणजे अक्षरश: हागणदारी होती. फिरताना जमीनीवरची स्वच्छ भारत रांगोळी तुडवली तर जाणार नाही ना याची काळजी घ्यावी लागत होती. असा एकूण आनंदी आनंद आहे...

तेर
सोलापुराहून नव्वदेक किलोमीटर अंतरावर आहे. उस्मानाबादहून पंचविसेक किलोमीटर. म्युझियममधल्या
कर्मचार्यांकडून नीट माहिती घेतल्यासच गावातल्या इतर स्थळांना भेट देता येते. मी
फ़िरत असताना इथल्या कर्मचार्याची मला खूप मदत झाली.
(संदर्भ: तेर, शां. भा. देव, प्रकाशक - पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग, सातवाहनकालीन महाराष्ट्र, रा. श्री. मोरवंचीकर, लज्जागौरी, रा. चि. ढेरे, The history and inscriptions of the Satavahanas and the Western Kshatrapas by V. V. Mirashi)

As expected,Excellent.pl.circulate it widely.shall i put it on some group.
ReplyDeleteThanks for appreciation! Yes you may further circulate it.
ReplyDeleteSangram, Dr. Prashant Narnaware, Collector Osmanabad, should know this. Do contact him and discuss.
ReplyDeleteVivek
धन्यवाद सर! जरूर संपर्क करीन आणि चर्चा करीन.
DeleteSangram
ReplyDeleteYou have written it nicely. Hope it reaches to competent authority to take care of the campus and ancient monument
Thanks Mahesh! I too hope so.
DeleteSangramji, while I was in India as a Marketing Manager, I have been to Omraga, Ter, Osmanabad, Tuljapur, Asa, Laura, Yermala, Murud, Terana, Killari and Manja Sugar factory areas few times. Never ever anybody mentioned about Ter as the historical place. I would have definitely visited it otherwise. This shows the anathema of the local people. Your article will surely open new doors and new efforts for restoration of Ter, the historical. Congrats.
ReplyDeleteKishor Gore, Princeton, New Jersey, USA
Thanks Kishorji! The awareness about the place is really low. Let us hope that the situation improves.
Deleteधन्यवाद ! खूप छान लेख ! :)
ReplyDeleteखूप छान माहीतीपूर्ण लेख अन समर्पक फोटो👌👌👌👍
ReplyDelete