Tuesday, 27 November 2012

Life of Pi पाहताना


मितींच्या जबड्यातून विस्फारत अनंताकडे
विरघळत जाते अवघे थिएटर

नाचतात थुईथुई भानांचे कण

निखळताना वास्तवाचे विक्राळ नांगर 



सुरु होतो प्रशांत प्रवास

प्रपाती लाटांच्या प्रच्छन्न हेलकाव्यांवरून

उजळवत चुकार कोपरे

आयुष्यभराच्या गुहेतले आदिम.



रेंगाळतो मोरपंखी तृणपात्यावर

महासागराचा निळासावळा दवबिंदू

प्रकटतो सृष्टीचा प्रकांड सांधा

प्रकाशताना खोल पाताळझरे

1 comment:

  1. उजळवत चुकार कोपरे

    आयुष्यभराच्या गुहेतले आदिम.....

    too good sir....

    ReplyDelete